वनधन विकास केंद्र आदिवासी स्वयंकला संस्थान चातगावची सभा संपन्न

175

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत चातगावच्या सभागृहात वनधन विकास केंद्र आदिवासी स्वयंकला संस्थान चातगावची सभा 10 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आली. या सभेला कोयतूर शेतकरी उत्पादक कंपनी गडचिरोलीचे अध्यक्ष श्री. बी. डी. मडावी, प्रकल्प कार्यालय गडचिरोलीचे वनधन योजना मार्गदर्शक श्री. एम. डी. मेश्राम, प्रकल्प कार्यालय गडचिरोलीचे श्री. वेलादी, कोयतूर शेतकरी उत्पादक कंपनी गडचिरोलीचे श्री. सी. कुळमेथे, चातगाव ग्रामपंचायतचे सरपंच श्री. गोपाल उईके यांच्यासह आदिवासी जमातीचे 300 सदस्य उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी वनधन विकास योजनेवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रवीण मडावी यांनी केले. या सभेला चातगाव, महावाडा, कटेझरी, खुटगाव, गिरोला, कुडकवाही, उदेगाव, परसवाडी इत्यादी गावातील नागरिक उपस्थित होते.