विदर्भ क्रांती न्यूज
ब्रह्मपुरी : तालुक्यातील बेलगाव खुर्द येथे काल दुपारी ४ वाजताच्या सुमारास गावाच्या लगत पट्टेदार वाघाचे वावरणे गावातील लोकांना दिसले. अशातच वाघाने एका कुत्र्याला सुद्धा जखमी केले. त्यामुळे गावातील व परिसरातील लोक भयभीत झालेले आहेत. अचानक दौऱ्याप्रसंगी या क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांची भेट झाली असता लगेचच त्या गावी जाऊन लोकांच्या वाघाच्या दहशतीची समस्या जाणून घेतल्यानंतर याची दखल घेत खा. अशोकजी नेते यांनी ब्रह्मपुरी वनविभागाचे उपसंरक्षक अधिकारी श्री. दिपेश मल्होत्रा यांना दूरध्वनीवरून वाघाच्या संदर्भामध्ये बंदोबस्त करण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते.प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस. टि. मोर्चा तसेच कार्यकर्ते व गावातील लोक उपस्थित होते.