भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या घरी गणपती बाप्पा विसर्जनानिमित्त दिली सदिच्छा भेट

35

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. दिड दिवसाचा गणपती बाप्पाचा आज विसर्जन करण्यात आला. त्या निमित्ताने जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी गणपती बाप्पाच्या दर्शनाला उपस्थित राहुन सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी, होळी मॅडम, महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, रश्मी बानमारे, पुनम हेमके उपस्थित होते.