आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे श्री गणरायाचे आगमन

60

– सहपरिवार केली श्री गणेशाची पूजा

– गडचिरोली जिल्हा वासियांच्या सुख समाधानासाठी गणरायाला घातले साकडे

– शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे अशी श्रीगणरायाला घातले साकडे

गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांनी सहपरिवार श्री गणेशाची भक्ती भावाने पूजा केली.

गडचिरोली जिल्ह्यात यावेळी आलेल्या अतिवृष्टी व महापुराच्या संकटाने जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला असून या संकटातून जिल्ह्यातील नागरिकांना बाहेर काढून त्यांना सुखी व समाधानी करावे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील आलेले संकट दूर करावे असे साकडे त्यांनी गणरायाला घातले.

याप्रसंगी त्यांच्या धर्मपत्नी सौ. बिनाराणी देवरावजी होळी, डॉक्टर दीपेश देवरावजी होळी यांच्यासह होळी परिवारातील सदस्य तसेच भाजपा परिवारातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.