विकास करण्यासाठी आराखडा तयार करणे आवश्यक : खा. अशोकजी नेते

55

– नगर परिषद आमगाव येथे आढावा बैठक

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया : नगर परिषद आमगाव येथे खा. अशोकजी नेते गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती मोर्चा यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला.

या बैठकीदरम्यान खासदार अशोकजी नेते यांनी बोलताना नगरामध्ये सांडपाण्याची व्यवस्थेबाबत कशी व्यवस्था केली जाईल. वाढीव पाणीपुरवठा, विकास निधी अंतर्गत प्रस्तावित नवीन कामे तयार करणे, पंतप्रधान आवास योजनेचा अहवाल, सार्वजनिक शौचालय नियोजन, पुरपरिस्थितीमुळे पिकांचे झालेले नुकसान व पंचनामे, रस्त्याच्या अडचणी व फेडरेशन धान खरेदी केंद्र महामंडळ यासंदर्भातसुध्दा चर्चा करण्यात आली.
अशा विविध विषयाचा आराखडा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देऊन निर्देश दिले.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते यांच्यासह विजयभाऊ शिवनकर माजी जि. प. अध्यक्ष गोंदिया, राकेशजी शेंडे महामंत्री, राजुभाऊ पटले महामंत्री, घनश्यामजी अग्रवाल, CEO डॉ. पवन मात्रे, सुभाष आकरे तहसीलदार, नरेंद्र वाजपेयी महामंत्री, खुगमचंद अग्रवाल, यशवंत मानकर, मोहिनी निंबारते, कैलास तिवारी, देवेंद्र मच्छीरके तसेच भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.