गोकुळनगर गडचिरोली येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

141

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गोकुळनगर गडचिरोली येथे दि. २७ ॲागस्ट २०२२ रोजी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश काँँग्रेस महासचिव डॉ. नामदेवराव उसेंडी तर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. एन. डी. किरसान होते. प्रमुख पाहुणे म्हणून शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा काँग्रेस कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष डी. डी. सोनटक्के, खोब्रागडे, भैसारे, वाटेकर काकाजी, बांबोळे, पांडुरंग भांडेकर, रमेश धकाते, रुपेश नांदनकर, सुरेश बांबोळे होते. तान्हा पोळ्याचे आयोजन अनु. जाती महिला जिल्हाध्यक्ष अपर्णा खेवले, आशा मेश्राम, बाळू मडावी, माजीद सय्यद, जावेद खान यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अनुप कोहळे यांनी केले. या उत्सवात मोठ्या संख्येने बालगोपालांनी नंदी सजवून आणले होते. त्यांच्यात उत्साह दिसून येत होता. नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात भाग घेतला. नंदीची पूजा करुन कार्यक्रमाला सुरुवात करुन रांगेत आपापले नंदी घेऊन उभ्या असलेल्या बालकांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटकासह प्रमुख पाहुण्यांनी भेटून निरिक्षण केले. प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक म्हणून सायकली देण्यात आल्या तर प्रोत्साहनपर सर्वांनाच स्कूलबॅग व छत्र्या देण्यात आल्या. कार्यक्रम सौदार्हपुर्ण वातावरणात व उत्साहात पार पडला.