माजी जि. प. अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात अहेरी नगरपंचायतीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांंची भेट व विविध विषयांवर केेली चर्चा

129

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी नगर पंचायतमधील शिष्टमंडळाने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन अहेरी नगर पंचायतमधील विविध विकास कामांंबाबत चर्चा करण्यात आली. तसेच भ्रष्टाचार झालेल्या कामाबाबत चौकशी करण्यात यावी आदीबाबत निवेदन देवून अहेरी नगर पंचायतमधील विविध विकास कामांंबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष रोजा करपेत, नगर पंचायतचे उपाध्यक्ष शैलेशभाऊ पटवर्धन, नगरपंचायतचे बालकल्याण सभापती मीना माणिक ओंडरे, नगरसेविका ज्योतीताई सड़मेक, नगरसेविका निखत रियाज शेख, नगरसेवक विलास सिडाम, नगरसेवक विलास गलबले, नगरसेवक महेश बाकेवार, स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, अजयभाऊ सडमेक उपस्थित होते.