भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

63

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा युवा मोर्चाचे गडचिरोली जिल्हा महामंत्री श्री. मधुकरजी केशवराव भांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता चामोर्शी तालुक्यातील आमगाव (महाल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप व फळ वाटप आदी कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिक व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.