जा. कृ. बोमनवार विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा व उपक्रमाचे आयोजन

50

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी : स्थानिक जा. कृ. बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शालेय स्तरावर निबंध, वकृत्व व चित्रकला स्पर्धा व उपक्रम घेण्यात आले.
निबंध स्पर्धा ‘स्वातंत्र्याचे 75 वर्ष’ या विषयावर घेण्यात आली. यात वर्ग 5 ते 12 च्या 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये टिना खरकाटे वर्ग 8 वा ब, शिवानी खेवले वर्ग 8 वा ब, समीक्षा उंदिरवाडे वर्ग 10 अ, प्राची बुरांडे वर्ग 10 वा अ, आचल सातपुते वर्ग 12 अ विज्ञान, राशी येरावार वर्ग 12 अ विज्ञान यांनी सुयश मिळविले आहे.
वकृत्व स्पर्धा ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महिलांचा सहभाग’ या विषयावर घेण्यात आली. यामध्ये वर्ग 6 ते 12 च्या 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये शिवानी खेवले वर्ग 8 ब, टिना खरकाटे वर्ग 8 ब, समीक्षा उंदिरवाडे वर्ग 10 अ, गायत्री वैरागडे वर्ग 9 अ, प्राजक्ता सातपुते वर्ग 12 वा अ विज्ञान, स्वरुपा गव्हारे 12 वा अ विज्ञान यांनी सुयश मिळविले आहे.
चित्रकला स्पर्धा ‘हर घर तिरंगा’ या विषयावर घेण्यात आली होती. यामध्ये वर्ग 5 ते 12 च्या 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये कू.संस्कृती बत्तुलवार वर्ग 5 कावेरी चौधरी वर्ग 5, गुंजन पत्रे वर्ग 6, शिवानी खेवले, मधूमिता दास वर्ग 10 अ, संस्कृती श्रीरंग वर्ग 10 अ, खुशबू सोमनकर वर्ग 11 वा ब विज्ञान, राहेल येलमुले वर्ग 11 वा अ विज्ञान यांनी सुयश मिळविले.
या विविध स्पर्धा प्रभारी प्राचार्य श्री. इतेंद्र चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. हेमंत मगरे, प्रा. संजय भुरभुरे, प्रा. नोमेश्वर उरकुडे, स. शिक्षक प्रमोद भांडारकर, अशोक गजभिये, घनशाम मनबत्तुलवार यांच्या नेतृत्वात पार पडल्या. सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.