शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात पंचायत समिती अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

94

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिवाजी हायस्कूल येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचा विषय ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महिलांचा सहभाग’ हा होता. या स्पर्धेमध्ये शहरातील सर्वच शाळेतील स्पर्धक सहभागी झालेले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य रा. ना. ताजने होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून श्री अलोणे विस्तार अधिकारी शिक्षण, श्री आभारे केंद्र प्रमुख चामोर्शी, श्री पंचफुले नोडल अधिकारी उपस्थित होते.
मुख्य परीक्षक म्हणून श्री. प्रा. चौथाले सर यांनी काम पाहले तसेच परीक्षक म्हणून साखरे, मंडल, राडेकर, येनूरकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चौथाले यांनी केले व स्पर्धेचे नियम व अटी सर्वाना समजवून सांगितले. स्पर्धेचे संचालन प्रा. नरुले यांनी केले तर आभार आडे यांनी मानले.