शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

92

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी : शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री. दादाजी चापले यांच्या हस्ते ध्वजरोह ठीक सकाळी 7.35 वाजता पार पडले.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री. रा. ना. ताजने, पर्यवेक्षिका सेलूकर, माजी प्राचार्य भिलकर, शाळेतील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शि. शि. प्र. मं. चे सदस्य चापले म्हणाले की, 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. आपण सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे व आपली प्रगती साधवी व खेळाच्या माध्यमातून आपले शरीर मजबूत करावे व निरोगी रहावे व देशाची सेवा करावी, असे त्यांंनी सांगितले.