विदर्भ क्रांती न्यूज
चामोर्शी : श्री गुरूक्रुपा समाजसेवी संस्था, चामाेर्शी द्वारा संचालित जा. कृ. बाेमनवार माध्यमिक विद्यालय तथा विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात सत्र २०२२-२३ करिता पालक – शिक्षक संघाची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यासाठी प्रभारी प्राचार्य इतेंद्र चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पालक- शिक्षक सभा आयोजित करण्यात आली.
प्रभारी प्राचार्य इतेंद्र चांदेकर यांनी पालक – शिक्षक संघाच्या स्थापनेचे महत्व, उददे्श, रचना याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी पालकांनी जागरुक असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
पालक – शिक्षक संघांच्या अध्यक्षपदी प्रभारी प्राचार्य इतेंद्र चांदेकर, उपाध्यक्षपदी माधुरी कमलेश बर्लावार, सचिवपदी प्रा. नंदकिशोर मेनेवार सहसचिवपदी। पुरुषोत्तम घ्यार यांची निवड करण्यात आली.
पालक सदस्य २३, वर्गशिक्षक यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी, शालेय, सहशालेय उपक्रमाविषयी चर्चा करण्यात आली.
संचालन प्रा. खुशाल कापगते, तर आभार प्रदर्शन प्रा. सचिव नंदकिशोर मेनेवार यांनी केले. याप्रसंगी शिक्षक- शिक्षिका, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.