संघर्षनगरातील (स्नेहनगर) समस्यांचे लवकरच निवारण करणार : भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे

51

– संघर्षनगर (स्नेहनगर) येथे भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील संघर्षनगर (स्नेहनगर) येथिल नागरिकांच्या आग्रहास्तव भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघर्षनगर (स्नेहनगर) येथिल नागरिकांना भविष्यात मुलभूत सुख-सोयी उपलब्ध होणार असुन येथील समस्यांचे लवकरच निवारण करणार असल्याचे प्रतिपादन प्रमोदजी पिपरे यांनी केले.
ध्वजारोहण कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, निताताई उंदिरवाडे, संजय बोधलकर, विनोद लटारे, सोमेश्वर भोयर, गिरीश मुरमुरवार, शिल्पाताई लटारे, वेणूताई लाटकर, गणेश बोबाटे, छाया भोयर, गीता प्रधान, अर्चना मुरमुरवार, देवचंद खैरे, देवेंद्र लाटकर, यादव कौशल, हेमलता पुज्जलवार व संघर्षनगर येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.