विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली येथील आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्याने कारगील चौक स्मारकाच्या सौंदर्यीकरण्याचेे उद्घाटन खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते म्हणाले, कारगील हे नाव तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीजी पंतप्रधान असताना कारगील युद्ध झाले. या कारगील युद्धात अनेक शूरवीरांनी, हुतात्म्यानी, बलिदान देऊन कारगील विजय मिळविला. त्याच विजयाचे प्रतीक म्हणून कारगील हे नाव देण्यात आलं. कारगील विजय दिवस हा प्रत्येक नागरिकांना महत्वाचा व आपल्या देशासाठी अभिमानाचा दिवस आहे. आज 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कारगील चौक स्मारकाच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन होत आहे ही अतिशय आनंदाची उत्साहाची बाब आहे, असे प्रतिपादन खा. अशोकजी नेते यांनी केले.
या कारगील चौक सौंदर्यीकरणाच्या कामाची मागणी मागील काही वर्षापासून केलेली होती. ती आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पूर्ण झाली ही एक कौतुकास्पद बाब आहे.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते, डॉ. देवराव होळी आमदार, प्रमोदजी पिपरे जि. महामंत्री, रेखाताई डोळस प्रदेश सदस्या, योगीताताई पिपरे माजी नगराध्यक्षा, मुक्तेश्वर काटवे शहर महामंत्री, अनिल कुनघाडकर माजी उपाध्यक्ष, वैष्णवी नैताम माजी नगरसेविका ,रामटेके ताई, विशाल वाघ मुख्याधिकारी न. प., बेंबरे मुख्याधिकारी, इंजि. भालेराव, भंडारकर, प्रीती काकरकर, पठानताई, सुंदराताई करकाडे, वच्छलाताई मुनघाटे, तसेच अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.