विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव घरघर तिरंगा अंतर्गत भारतीय जनता पार्टी गडचिरोली येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
‘भारत माता की जय, वंदे मातरम्, स्वातंत्र्य दिन चिरायु होवो’ या जय घोषाने स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते, आमदार डॉ. देवराव होळी, प्रमोदजी पिपरे जि. महामंत्री, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, ज्येष्ठ नेते सुधाकर येनंगदलवार, रेखाताई डोळस प्रदेश सदस्या, मुक्तेश्वर काटवे शहर महामंत्री, अरुणजी हरडे, अनिल पोहणकर जि. उपाध्यक्ष, अविनाश महाराज, संजय बारपात्रे, नंदुजी सारडा, अनिल कुनघाडकर, श्रीकांत पतरंगे, डेडुजी राऊत, शंभू गेडाम, कुलसंगेजी, पुष्पाताई करकाडे, वच्छलाताई, तसेच अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.