कत्तलखान्यात जाणाऱ्या ५२ गोवंशाची सुटका

104

– दोन ट्रकसह मुद्देमाल जप्त ; गडचिरोली पोलिसांची कारवाई

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील तसेच सीमावर्ती महाराष्ट्र भागातील स्थानिक शेतकऱ्यांकडून गोवंशांची खरेदी करून मालवाहू वाहनामध्ये कोंबुन दाटीवाटीने व निदर्यतेने भरून कत्तलीकरिता नेत असताना गडचिरोली पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून ५२ गोवंशांची सुखरूप सुटका केली. यावेळी पोलिसांनी दोन ट्रकसह मुद्देमाल जप्त करीत गोवंशांंची तस्करी करणाऱ्यांंच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी गोवंश ट्रकमध्ये कोंबुन पेंढरीमार्गे नेत असल्याच्या गोपनिय माहितीवरून पोमके गट्टा (फु.), पोमके चातगाव, पोस्टे कारवाफा, पोस्टे धानोरा इत्यादी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या दरम्यान पोमके गट्टा (फु.) येथील बॅरिकेटला धडक मारून वाहने भरधाव वेगाने निघून गेले. मात्र पोमके चातगाव येथे नाकाबंदी असल्याने व योग्य समन्वयाने चातगाव येथे कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक अडवून तपासणी केली असता ट्रकमध्ये जनावरे दिसून आली. पोलिसांनी कारवाई करीत सदर ५२ जनावरांची मुक्तता केली. या प्रकरणी गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल केला.

सदर कार्यवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी प्राणहिता अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी मयुर भूजबळ यांच्या नेतृत्वात सपोनि संतोष पाटील, पोउपनि प्रकाश चौधरी, पोमके चातगाव तसेच पोहवा / अमोल धात्रक, पोहवा / शंकर मट्टामी, पोना / सुधाकर दंडिकवार, पोशि शरद जाधवर, पोशि पंकज नाडमवार, पोशि प्रभाकर राठोड यांनी केली.