– पंचायत समिती चामोर्शीच्या वाटरप्रूफिंगकरिता निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी
– चामोर्शी पंचायत समितीला भेट देवून पावसाच्या पाण्यामुळे गळणाऱ्या भागाची केली पाहणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी आपण शासनस्तरावर पत्रव्यवहार केला असून त्याकरिता लागणाऱ्या निधीची मागणी ही केली आहे. त्यामुळे लवकरच या पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासन स्तरावरून आपण निधी मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिले.
नवीन प्रशासकिय ईमारत ऊभी होईपर्यंत या पंचायत समितीच्या चामोर्शीच्या वाटरप्रूफिंगकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी वरिष्ठांकडे केली. याप्रसंगी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी श्री. पाटील, सहाय्यक बीडीओ वरघंटीवार, विस्तार अधिकारी काळबांधे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हुलके, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथजी बुरांडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रतिकजी राठी, ओबीसी नेते भोजराजजी भगत यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पावसाच्या पाण्यामुळे पंचायत समितीची इमारत गळत असून या ठिकाणी पावसात येणाऱ्या अडचणी समितीच्या अधिकाऱ्यांनी आमदार महोदयांजवळ मांडल्या. त्यानंतर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या इमारतीची पाहणी केली. त्या ठिकाणी त्यांना इमारत काही भागांमध्ये खरोखरच गळत असल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या अडचणीही समजून आल्यात. त्यामुळे त्यांनी लगेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना आश्र्वस्त करीत आपण पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारती करिता निधी उपलब्ध करून देऊ, असे त्यांना आश्वस्त केले.