भाजपा महिला मोर्चातर्फे राखी व निबंध स्पर्धेचे आयोजन

67

– जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे : रेखाताई डोळस

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपा महिला मोर्चाच्या वतीने रक्षाबंधन सणा निमित्ताने 5 ते 15 वयोगटातील मुला – मुलींसाठी राखी व निबंध स्पर्धेचे निःशुल्क आयोजन गुरुवार, दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी साई मंदिर चामोर्शी रोड गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

निबंध स्पर्धेचा विषय ‘राखी हा सांस्कृतिक सन आहे’. या स्पर्धेत प्रथम बक्षीस 3000 रुपये, द्वितीय बक्षीस 2000 रुपये, तृतीय बक्षीस 1000 रुपये, प्रोत्साहनपर दोन बक्षीस 500 रुपये ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भाजपा गडचिरोली कार्यालय येथे संपर्क साधावा व जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, प्रीती कातरकर, सविता लभाने, संगीता कुळमेथे, श्रीकांत कातरकर, सलीम शेख, गीता कोडापे यांनी केले आहे.

स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8408027174, 9403185048, 8999572473, 9834749545 यावर संपर्क साधावा, असे कळविले आहे.