८ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्त्वपूर्ण बैठक

144

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्त्वपूर्ण बैठक स्थानिक पत्रकार भवन येथे दिनांक ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता विविध विषयांवर आयोजित केलेली आहे. तरी शहरातील भाजपा जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी तसेच सर्व आघाडीचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड यांनी केले आहे.

बैठकीचे विषय १४ ऑगस्ट फाळणी दिन अथवा विभाजन विभिषिका स्मृती दिन या कार्यक्रमाचे आयोजन, तिरंगा रॅली, घरोघरी तिरंगा उपक्रम, बुथ रचना सक्षमीकरण व आगामी नगरपरिषद निवडणूक हे आहेत. ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण असूून कृपया सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष मा. श्री. किसनजी नागदेवे, उद्घाटक म्हणून खासदार मा. श्री. अशोकजी नेते, सहउद्घाटक म्हणून आमदार मा. श्री. डॉ. देवरावजी होळी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबूरावजी कोहळे, संघटनमंत्री रवींद्रजी ओल्लारवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गोविंदजी सारडा, प्रशांतजी वाघरे, किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे उपस्थित राहणार आहेत. ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण असूून सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असेही आवाहन आयोजक शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड यांनी केले आहे.