चामोर्शी पत्रकार समितीच्या वतीने कृषक हायस्कूल येथे वृक्षारोपण

52

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी : चामोर्शी पत्रकार समितीच्या विद्यमाने कृषक हायस्कूल चामोर्शी येथे विविध उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. पत्रकार समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, पाणपोई, गरजुंंना शालेय साहित्य वाटप, गरिबांंना अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम घेण्यात येतात.

शालेय परिसरात कडुलिंब, चिकू, आंबा, करंजी, फणस, सिसम आदी विविध प्रजातींंच्या झाडांची लागवड करण्यात आली. या यावेळी चामोर्शी पत्रकार समितीचे अध्यक्ष लोमेश बुरांडे, उपाध्यक्ष बबन वडेट्टीवार, सचिव कालीदास बन्सोड, सहसचिव चंद्रकांत कुनघाडकर, कोषाध्यक्ष अयाज शेख, सदस्य गजानन बारसागडे, नरेंद्र सोमनकर, अमित साखरे व शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.