मा. खासदार संजय राऊत साहेब यांच्या अटकेविरोधात गडचिरोलीतील शिवसैनिकांचा केंद्र शासनाविरोधात एल्गार

90

– मा. खासदार संजय राऊत साहेब यांच्या अटकेचे पड़साद गडचिरोलीत, शिवसैनिक आक्रमक

– शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात आंदोलन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केंद्र सरकारने केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून सुडबुुध्दीने कारवाई करीत आहे. शिवसेनेचे तडफदार नेते तथा खासदार मा. संजय राऊत साहेब यांच्यावर सुध्दा इडीने सुडबुध्दीने कारवाई करीत अटक केली आणि शिवसेनेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करीत या कारवाई विरोधात गडचिरोली येथील शिवसैनिक संतप्त होऊन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात ३ ऑगस्ट रोजी अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यलयापासून इंदिरा गांधी चौकापर्यंत निषेध रॅली काढून स्थानिक इंदिरा गांधी चौकात आंदोलन करून मा. खासदार संजय राऊत साहेब यांच्या विरोधात करण्यात आलेल्या करवाईचा निषेध करण्यात आला. शिवसैनिक स्थानिक इंदिरा गांधी चौकात गोळा झाल्यानंतर निदर्शने करण्यात आली. जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना खासदार मा. संजय राऊत साहेब यांचा विजय असो, संजय राऊत साहेब संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, जिंदाबाद जिंदाबाद मा. संजय राऊत साहेब जिंदाबाद, अशा घोषणांनी शिवसैनिकांनी इंदिरा गांधी चौक परिसर दणाणून सोडला. शिवसेनेचे झुंजार नेते खा. मा. संजय राऊत साहेब यांच्यावर इडीकडून करण्यात आलेल्या कारवाईचा शिवसैनिकांनी निषेध करीत केंद्र सरकारवर आसूड ओढले. केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर सुडभावनेने कारवाई करीत आहे. मा. खासदार संजय राऊत साहेब यांच्यावर कारवाई करून शिवसेनेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना ही हिंदू हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिकांची सेना आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेचा आवाज दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. परंतू शिवसैनिक कधीही कोणापुढे झुकणार नाही. केंद्र सरकारच्या हुकुुमशाही कारभारा विरोधात शिवसेना सडेतोड उत्तर देईल. इडीला हाताशी धरून शिवसैनिकांचा अंत कोणाीही पाहून नये, असा इशाराही शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने देण्यात आला. देशात अद्यापही लोकशाही जिवंत असून न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. मा. खासदार संजय राऊत साहेब यांच्या विरोधात करण्यात आलेली कारवाई निरर्थक असून केवळ राजकीय सुडबुध्दीने करण्यात आली आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. यापुढे कुणी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही मा. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशाराही शिवसेना सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार व शिवसैनिकांनी या आंदोलनाच्या माध्यमातून दिला. मा. खासदार संजय राऊत साहेब यांच्या अटकेविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसेना सहसंपर्कप्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, महिला जिल्हा संघटिका छायाताई कुंभारे, जिल्हा संघटक विलास ठोबरे, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, सुनंदाताई आतला, नवनाथ ऊके, विलास ठोंबरे, संदीप अलबनकर, प्रशांत ठाकुर, संदीप भुरसे, मुकेश गुरनुले, सूरज उइके, अमित बानबले, आनंदराव चुधरी, दिलीप चनेकर, ईश्वर लाजुरकर, रूपेश हतबले, स्वप्निल मोडक़र, तुषार बोरकर, अष्पक सय्यद, रूपेश सिडाम, तुषार मशाखेत्री, मोहन आड़े, रविन्द्र जेंगठे, प्रमोद कोकोडे, महेश भोयर, विकास उन्दिरवाडे, जयकुमार खेडेकर, कुशन ठवले, क्षत्रपती भैसारे, कवडू धंधरे, विट्ठल मंदिकर, अमोल मड़ावी, कृष्णा बावने, दीपक सेलोट, राहुल सोरते, अरुण बारापात्रे, बंटी वलादे, राजू जवाड़े, घनशाम उइके, प्रशांत शेडमाके, मधुकर बावने, सूरज टेकाम, सचिन सेलोट, किशोर देशमुख, हरबाजी दजगये, कैलास भुरसे, ईश्वर लाजुरकर, त्र्यम्बक फुलझेले, खुशाल चुधरी, संदीप टेम्भूर्ण, वासुदेव दोम्बले, नानाजी रंधये, पूंजीराम चुधरी, भगवान चनेकर, राहुल खेवले, तानबा दाजगये, अभिषेक कुकडे, अमर मड़ावी, आबाजी लोनबले यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.