धानोरा तालुक्यातील खेडी येेेथे राईस आरटीपी मशीनद्वारेे यांत्रिकी पद्धतीने केली भात रोवणी

62

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील खेडी येेेथील शेतकरी श्री. रवि जांगी यांच्या शेतावर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने राईस आरटीपी मशीनद्वारेे (RICE RTP Machine) यांत्रिकी पद्धतीने दि. 29 जुुलै रोजी भात रोवणी करण्यात आली.

Mat भात परे नर्सरी दि. ५ जुलै रोजी लावण्यात आली असून भात रोवणी दि. २९ जुलै करण्यात आली. म्हणजे केवळ २०-२४ दिवसात धान परे रोवणीकरिता तयार झाले.

१० एकरवर सदर रोवणी करण्यात येत आहे. बियाणे ५० % कमी लागले व रोवणीमध्ये ४० हजार रुपयांची बचत झाली. यांत्रिकी पद्धतीने १० एकर रोवणी २ दिवसात होते तर मजुरांनी १० दिवस लागत असते. मशीनमुळे ३०×१५ cm fix अंतर ठेवता आले. त्यामुळे फुटवे जास्त फुटणार असल्याचे शेतकऱ्याने म्हटले आहे.

यावेळी धानोराचे तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, कृषी पर्यावेक्षक श्री. खेडकर, कृषी सहायक श्री. शिंगणे, शेतकरी श्री. रवी जांगी व इतर मजूर उपस्थित होते.