नक्षल बॅनर लावण्याच्या प्रकरणात पीएचसीच्या डॉक्टरसह तिघांना अटक

41

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात नक्षल सप्ताह सुरू असून या सप्ताहादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दुर्गम भागात पोलीस जवानांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. नक्षल सप्ताहाच्या काळात एक धक्कादायक घटना उजेडात आली असून नक्षली बॅनर लावण्याच्या प्रकरणात एका कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे.  डॉ. पवन उईके असे डॉक्टरचे नाव असून सदर डॉक्टर कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. तिघांवरही युएपीए कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. अतिदुर्गम भागात केलेल्या संवेदनशिल कार्यवाहीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. डॉक्टरच्या अटकेबाबत पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी अटकेची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.