सरकारने पूरग्रस्तांना हेक्टरी ७५ हजारांंची मदत करावी : प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले

40

– मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीतील पूरग्रस्त भागात न जाता वैनगंगा नदीला भेट देऊन केवळ पर्यटन केल्याची पत्रपरिषदेत टीका

– माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांचीही पत्रपरिषदेत उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हयातील दक्षिण भागाला अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतातील विविध पिकांंचे मोठ्या प्रमाणाात नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली सापडून जीवनावश्यक साहित्यांंचे सुुुुुुद्धा नुकसान झाले. त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना हेक्टरी ७५ हजारांंची मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोलीत येऊनही पूरग्रस्त भागात न जाता त्यांनी पूर नसलेल्या भागातील वैनगंगा नदीला भेट देऊन केवळ पर्यटन केल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोले पुढे म्हणाले, अतिवृष्टी आणि तेलंगणातील मेडीगट्टा धरणाचे पाणी सोडल्याने सिरोंचा तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील २५ गावे पाण्याखाली सापडली. त्यामुळे काही गावातील नागरिकांना राष्टीय महामार्गावर राहुटया बांधून आसरा घ्यावा लागला. अद्यापही राज्य सरकारने पुरग्रस्तांना मदत दिलेली नाही. हे सरकार आंधळ आणि मुक्याचे आहे, अशीही टीका नाना पटोले यांनी केली.

नियम धाब्यावर बसवून तत्कालीन फडणविस सरकारने मेडीगट्टा प्रकल्पाला नाहरकत दिली. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना पूरपरिस्थीतीचा सामना करावा लागत आहे, भाजप सरकारने नेहमीच गडचिरोली जिल्हयावर अन्याय केला आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला. पत्रकार परिषदेला माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेव किरसान, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, माजी जि. प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, शहराध्यक्ष सतिश विधाते यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.