मराठा सेवा संघ गडचिरोलीच्या वतीने राज कोहळेचा सत्कार

57

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील 50 घरे असणाऱ्या राजनागट्टा ह्या लहानश्या गावातील राज कोहळे यांची NIT (राष्ट्रीय प्राद्योगिक संस्था) आंध्रप्रदेशमध्ये उच्च शिक्षणाकरिता निवड झाल्याबद्दल मराठा सेवा संघ गडचिरोलीच्या वतीने सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक बांदूरकर, माजी जिल्हाध्यक्ष  दादाजी चापले, गोविंदराव बानबले, दादाराव चुधरी, पांडुरंग नागपुरे, प्रा. शेषराव येलेकर, राजेंद्र उरकुडे, चंद्रकांत शिवणकर, त्र्यंबक करोडकर, पुरुषोत्तम म्हस्के, राजचे मोठे बंधू अनुप कोहळे उपस्थित होते.
अतिसामान्य कुटुंबातील आलेल्या राजचे वडील वसंत कोहळे व आई कविता कोहळे दोघेही सामान्य शेतकरी आहे. परंतु ह्या सर्व परिस्थितीला मागे टाकत राजने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कठोर परिश्रम घेऊन 10 वी मध्येे 92 %, 12 वी मध्ये 94 % आणि त्यानंतर JEE mains मध्ये 96% मिळवले. त्या आधारावर त्याची NIT आंध्रप्रदेशकरिता निवड झाली. या निवडीचे श्रेय राज याने आई, वडील, मोठे भाऊ, सर्व मार्गदर्शक गुरू यांना दिले आहे.