कुरखेडा येथे कारगिल विजय दिन उत्साहात साजरा

54

– भाजयुमोच्या वतीने माजी सैनिकांचा कारगिल विजय दिनी सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गांधी चौक कुरखेडा येथे २६ जुलैला कारगिल विजय दिन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक गांधी चौक कुरखेडा येथे कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकाच्या प्रती आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, विषेश अतिथी पोलिश उपनिरीक्षक नारायण शिंदे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, प्रा. नागेश्वर फाये, नगरसेवक सागर निरंकारी, नगरसेवक अतुल झोडे, महिला तालुका अध्यक्ष जयश्री मडावी, भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, भाजयुमो तालुका मंत्री उल्हाास देशमुख, भाजयुमो जिल्हा सचिव प्रशांत हटवार, उपाध्यक्ष मंगेश मांडवे, तुषार कुथे, राहुल गिरडकर, रोशन कूभलवार, पंकज डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर ठाकूर, प्रवेश सहारे, बंटी देवगडले, स्वप्निल खोब्रागडे, शोएब पठाण, हरीश तेलका, ईश्वर बनसोड, नाकाडे गुरुजी, पंकज गुहेकर व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चांगदेव फाये, पोलीस निरीक्षक नारायण शिंदे, गणपत सोनकुसरे, प्रा. नागेश्वर फाये यांनी कारगिल विजय दिनाचे महत्व सांगून युवा वर्गानी नेहमी सैनिकाबद्दल आदर बाळगून देशी अभिमान जागृत ठेवावा असे मार्गदर्शन केले.
यावेळी माजी सैनिक कैलास बालाजी कुथे, दिगांबर गेडाम, आनंदराव काटेंगे या माजी सैनिकांंचा सत्कार करण्यात आला.