भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या ED चौकशीच्या विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

72

– भर पावसात सुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले आंदोलन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केंद्रातील स्वायत्त संस्थांंना हाताशी घेऊन त्यांना आपल्या परीने वागवण्याचा काम मागील अनेक वर्षापासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकार करीत आहे.
जे जे सरकार विरोधात बोलतात, लिहितात सरकारला सत्य परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना खोट्या गुन्ह्यांच्या आधारावर दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे.
ED हे स्वायत्त संस्था असून दुजाभाव हेतूने व फक्त केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे दिसते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांना सुद्धा ED ने नोटीस दिली असून ED ची ही कार्यवाही भाजपच्या सांगण्यावरूनच होत असल्याचे दिसते याचा निषेध म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 26 जुलै रोजी इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतिश विधाते, अनुसूचित जाती अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष रमेश चौधरी, ओबीसी विभाग अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, रोजगार स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, सहकार सेल शामराव चापले, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, जिल्हा महासचिव घनश्याम वाढई, हरबाजी मोरे, सुनील चडगुलवार, दिवाकर निसार, वसंत राऊत, ढिवरू मेश्राम, जितेंद्र मुनघाटे, सुभाष धाइत, राकेश रत्नावार, संजय मेश्राम, राजू रणदिवे, भैयाजी मुद्दमवार, परशुराम गेडाम, संतोष चौधरी, मुकुंदा बावणे, अमित गावतुरे, नितेश निकुरे, मनोहर गेडाम, दामोदर गावतुरे, वामन मानकर, गुणाजी राऊत, योगाजी राऊत, अब्दुल पंजवाणी, भारत येरने, कृष्णा झंजाळ, हंसराज उराडे, सदाशीव कोडापे, आशिष कामडी, जीवनदास मेश्राम, राकेश रत्नावार, मिलिंद बारसागडे, आय.बी. शेख, दीपक रामने, अरुण पुण्यपरेड्डीवार, सुखदेव वासनिक, चारुदत्त पोहणे, बाळासाहेब आखाडे, सुधीर बांबोळे, जावेद खान, विमल पुगांटी, बेबीताई कुमरे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.