गडचिरोलीत कारगील विजय दिन उत्साहात साजरा

90

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहरातील कारगील चौक येथे आज, 26 जुलैला कारगील विजय दिन कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक राजकीय पक्षांचे नेते यांनी आदरांजली वाहिली आहे.
कारगील चौक गडचिरोली येथे कारगील युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृती निमित्त भव्य कारगील स्मारक साकारण्यात आले आहे. सदर स्मारकचे काम 95% पूर्ण झाले आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे भारतीय शहीद सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याधिकारी विशाल वाघ, कारगील चौकचे अध्यक्ष उदय धकाते, सचिव प्रकाश भांडेकर, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, डॉ. नरेश बिडकर, नरेंद्र चन्नावार, सुनील देशमुख, किशोर सोनटक्के, राजेंद्र साळवे, अभियंता अंकुश भालेराव, प्रफुल आंभोरकर, वासुदेव बट्टे, महेंद्र वाघमारे, आसिफ पठाण, प्रतिष्टीत व्यापारी गोविंद सारडा, मेहर रूपेश सलामे, साहिल गोवर्धन, वैभव रामटेके, आकाश कुळमेथे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती असल्याने स्मारकाचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे. नगर परिषद गडचिरोलीतर्फे वैशिष्ठ्यपूर्ण योजना अंतर्गत सदर कारगील स्मारक साकारण्यात आले. पुढील महिन्यात या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे.
गुरुदेव उच्च प्राथमिक शाळा गडचिरोलीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींंनी कारगील स्मारकाला भेट देऊन शहीद सैनिकांना आदरांजली वाहून विजयाचा जयघोष केला. मागील 21 वर्षांंपासून येथे नित्यनेमाने कारगील विजय दिवस साजरा अध्यक्ष उदय धकाते यांच्या नेतृत्वात होत आहे हे विशेष.