भाजयुमोने आयोजित केलेला रक्तदानाचा उपक्रम अभिनंदनीय : आमदार कृष्णाजी गजबे यांचे प्रतिपादन

71

– भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांच्यासह २६ रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने राबवलेला रक्तादानाचा उपक्रम अभिनंदन असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले.
ते भारतीय जनता युवा मोर्चा कुरखेडाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे करण्यात आले होते. यावेळी भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांच्यासह 26 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.
रक्तदान करणाऱ्यांंमध्ये भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, डॉ. कमलेश परसवानी, जगदिश दखने, प्रा. नागेश्वर फाये, भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, शादिक शेख, मनोज भैया, समीर नंदेश्वर, किशोर खुणे, शोएब पठाण, प्रणय मडावी, गणपत बनसोड, मिननाथ नागपूरकर, साहिल फुलबांधे, रेहान मडावी, सुहास टेकाम, भुवनेश्वर गावड, मुनेशवर पंधरे, मयूर चन्ने, पंकज गानेवार, सीवा सरकार, राहुल गिरडकर, आरिफ शेख, चेतन खापरे यांनी रक्तदान करून शुभेच्छा दिल्या.
रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार कृष्णाजी गजबे यांनी रक्तदान करणाऱ्या युवक मंडळीचे विशेष अभिनंदन जनता जनार्धनाच्या आशिर्वादामुळे आपल्याला सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळत असते आणि मिळालेल्या आशीर्वादातून आपन सबका साथ, सबका विकास करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहू, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजपाचे ज्येष्ठ नेते गणपत सोनकुसरे ,भाजपा शहराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, भाजपा ज्येष्ठ नेते माधवदास निरंकारी, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बबलूभाई हुसेनी, नगरसेवक रामभाऊ वैद्य, भाजपा तालुका महामंत्री तथा विद्यमान नगर पंचायत पाणीपुरवठा सभापती उमेश वालदे, प्रा. नागेश्वर फाये, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य विवेक निरंकारी, महादेव पुंगळे, महिला तालुका अध्यक्षा जयश्री मडावी, विलास गावंडे, नगरसेवक सागर निरंकारी, नगरसेवक अतुल झोडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कमलेश परसवानी, डॉ. जगदिश बोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर यांनी केले तर आभार अँड उमेश वालदे यांनी मानले. रक्तदान शिबिराच्या यस्ववीतेसाठी विनोद नागपूरकर, डाँ. जगदिश बोरकर, सागर निरकांरी, प्रशांत हटवार, उल्हास देशमुख, अप्पु कुथे, मंगेश मांडवे, बंटी देवढगले, रश्मी मोगरे, बालु रहागडांले, राहुल दांडेकर, मोनेश मेश्राम, भाजयुमो पदाधिकारी, जिल्हा रक्त संक्रमण टिम व उपजिल्हा रुग्णालयाचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.