अबनपली येथील नागरिकांना अहेरी येथे हलविले : जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांचा पुढाकार

114

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील येंकटरावपेठा ग्रामपंचायत अतंर्गत येत असलेल्या अबनपली येते मागील अनेक दिवसापासून सतत सुरू असलेल्या अतिवृष्टी पावसाने अबनपली गावाला तिन्ही बाजूंनी पुरानी वेढा घातले होते. मात्र तेथील नागरिक बाहेर जाण्यास तयार नव्हते. सदर बाब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच माजी अध्यक्ष सदर गावात पाण्यातून वाट काढत पोहचत नागरिकांशी चर्चा करत सदर पूर वाढण्याची शक्यता असून तुम्हांला धोका होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सदर ठिकाणाहून बाहेर जाणे उचित आहे, असे समजूत काढले असता नागरिकांनी त्यांचे ऐकून घेतले. त्यानंतर अहेरीचे तहसीलदार श्री. ओतारी यांना पाचारण करून गाडी बोलवून सदर गावातील ८० ते १०० नागरिकांना अहेरी येथील एकलव्य शाळेत त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे.