अतिवृष्टीमुळे घर कोसळलेल्या गोकुळनगरातील वासियांना सय्यद मजीद यांनी केली मदत

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील ७ दिवसांंपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गोकुळनगरातील बाजीगर चौक येथे ४२ वर्षांंपुर्वी बांधलेले घर आज रात्री ३ वाजताच्या सुमारास कोसळले. हे बघून येथील नागरिकांनी सय्यद माजीद यांना कळविले. भाऊंना महिती मिळतास घटनास्थळ गाठले व विद्युत विभग व नगर परिषद गडचिरोली यांच्याशी संपर्क साधुन त्यांची यंत्रणा घटनास्थळी बोलावून त्यांना कामास लावुन अपघातग्रस्तांना योग्य ठिकाणी पोहचविले. यावेळी त्यांचे दुःख लक्षात घेवून वेळेवर आर्थिक मदत केली. यावेळी बाळूभाऊ मडावी, आशाताई मेश्राम, अपर्णाताई खेवले, जावेद खान व वॉर्डातील नागरिक तिथे उपस्थित होते.