डॉ. नामदेव किरसान पूरग्रस्तांना करणार 1 लक्ष रुपयांची मदत

83

– वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले संकल्प

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेवराव किरसान यांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा न करता जिल्ह्यातील सद्याची पूरपरिस्थिती आणि त्यामुळे येथील लोकांचे विस्कळित झालेले जीवन पाहता गरजूंना 1लक्ष रुपयां पर्यत अन्यधान्य किट व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करणार आहे. अचानक आलेल्या पुरामुळे अन्यधान्य वितरणाची गाडी पूरग्रस्तांपर्यत जाण्यास अडथळा येत असल्याने मार्ग मोकळे झाल्यावर लगेच अन्यधान्याची व इतर जीवनावश्यक वस्तुंची गाडी गरजूंना देण्यात येईल असे डॉ. नामदेव किरसान यांनी सांगितले.
यावेळी डॉ. नामदेव किरसान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना माजी खासदार तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, माजी आमदार पेंटाराम तलांडी, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहर अध्यक्ष सतिश विधाते, काँग्रेसचे जेष्ठ नेते शंकरराव सालोटकर, ललित बरचा, महासचिव समशेरखान पठाण, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, रजनीकांत मोटघरे, वामनराव सावसाकडे, दामदेव मंडलवार, ऍड. गजानन दुगा, रमेश चौधरी, सुनील ङोगरा, दीपक मडके, नेताजी गावतुरे, अतुल मल्लेलवार, विश्वजित कोवासे, अनिल कोठारे, विजय गोरडवार, नंदू कायरकर, सुनील चडगुलवार, राकेश रत्नावार, महादेव भोयर, अविनाश साळवे, सुभाष धाइत, आय. बी. शेख, डी. ऐन. रामने, घनश्याम मुर्वतकर, संजय चन्ने, घनश्याम वाढई, कुणाल पेंदोरकर, संजय पोरेड्डीवार, बाळासाहेब आखाडे, चारुदत्त पोहणे, अब्दुल पंजवानी, भैयाजी मुद्दमवार, बाबुराव गडसुलवार, श्रीकांत काठोते, रामभाऊ नन्नावरे, संदीप भैसारे, वसंत राऊत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, संजय नेरकर, कृष्णजी झंजाळ, पुष्पलता कुमरे, अपर्णा खेवले, कल्पना नंदेश्वर, आशा मेश्राम, वर्षा गुलदेवकर, नीता वडेट्टीवार, मिलिंद बारसागडे, अंकूश भानोसे, रोहित चंदावार, सूरज टेकाम, प्रज्वल वनस्कर, अमित लाटकर, राकेश गेडाम, अविनाश बांबोळे, विलास वाकडे, सुखदेव गेडाम, सुरेश आग्रे, जितेंद्र शिडाम, खुशाल लोणारे, प्रफुल कांबळे, मनोहर गेडाम, रेवनाथ धानफोले,योगाजी राऊत, परशुराम गेडाम, बाजीराव चौके, रामदास भोयर, काशिनाथ गावतुरे, वामन पोरटे, नानाजी गेडाम, चंदन राऊत, अनिकेत राऊत, नानाजी गेडाम, गौरव एनपरेड्डीवार, विपुल येलेट्टीवार, कुणाल ताजने, मयुर गावतुरे, सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.