माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे समाजातील कर्तबगार महिला म्हणून तैलिक गौरव पुरस्काराने सन्मानित

85

– नागपूर येथे तैलिक समाज बांधवांचा महामेळावा व तैलिक गौरव पुरस्कार

– युवा फाऊंंडेशन व आसा ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमानाने द्वारा प्रस्तुत संतु-तुकाची जोडी, लावा नामाची गोडी यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती

गडचिरोली : गडचिरोली नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई प्रमोद पिपरे यांची सामाजिक सेवा या श्रेणीमध्ये तैलिक गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

संताजी सांकृतिक भवन,सोमवारी क्वार्टर, बुधवार बाजार, सक्करदरा, नागपूर येथे दि. १२ जुलै रोजी युवा फाऊंडेशन व आसा ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने तैलिक समाजबांधवांचा महामेळावा व तैलिक गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म. प्रां. तै. प्रदेशाध्यक्ष मा. खासदार रामदासजी तडस, मुख्य अतिथी आसा ग्रुप ऑप कंपनीजचे अध्यक्ष डॉ. प्रशांतजी झाडे, प्रमुख अतिथी विधान परिषद आमदार अभिजित वंजारी, पुर्व नागपूर आमदार मा. कृष्णाजी खोपडे, माजी खासदार मा. सुरेश वाघमारे जवाहर विध्यार्थी गृह, रवीनगर अध्यक्ष रमेशजी गिरडे, तेली समाज सभा नागपूर जिल्हा, अध्यक्ष बाबुराव वंजारी, रा. तै. शा. महासभा राष्ट्रीय अध्यक्ष उमेश शाहु, म. प्रां. तै. महासभा सहसचिव बळवंत मोरघडे, नागपूर विभाग म. प्रां. तै. म. अध्यक्ष जगदीश वैद्य, म. प्रां. तै. महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे, उपाध्यक्ष अनिल आष्टनकर, युवा फाऊंडेशन संस्थापक प्रा. कुणाल पडोळे यांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांचा समाजातील कर्तबगार महिला म्हणुन प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवुन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष सत्कारमूर्ती म्हणुन अभिनेता मा. दत्तात्रय उबाळे तसेच विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा व दहावी-बारावीतील गुणवंत विध्यार्थी तसेच यूपीएससी, एमपीएससीमध्ये प्रावीन्यप्राप्त अधिकाऱ्यांचा तैलिक गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे या ५ वर्षे नगराध्यक्ष पदावर कार्यरत असताना तसेच आताही एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तेली समाजातील व ईतर समाजातील महिलांना जागृत करण्यासाठी समाज संघटन, विजया महिला नागरी पतसंस्थाच्या संचालिका, अनेक महिला बचत गटाच्या अध्यक्ष असून बचतगटाच्या माध्यमातून महिलांची सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्याकरिता महिलांचे सक्षमीकरण करून अनेक गोर-गरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून दिले आहे. तसेच कोरोना काळात बचत गटाच्या माध्यमातून गोर-गरीब,दलित व झोपडपट्टी भागात मोफत अन्यधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, सरकारी दवाखान्यात तसेच बाहेरून आलेल्या मजुरांना मोफत भोजन व्यवस्था व त्यांना त्यांच्या स्वगावी जाण्यासाठी वाहनांची मोफत व्यवस्था तसेच नगराध्यक्ष असतांना विकासकामे करून सामाजिक कार्य करण्यात आले. राजकारणापेक्षा समाज कारणाकडे जास्त भर देण्यात आला व इतरही सामाजिक कार्य केले व करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांचा आज तैलिक गौरव पुरस्कार देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी नवयुवक मंडळ संस्थापक सुभाष घाटे, युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष अतुल वांदिले, सं. ब्रि. ते. स. म. संस्थापक अजय धोपटे, ना. वि. महिला आघाडी अध्यक्ष नयना झाडे, युवा फाऊंडेशन व आसा ग्रुप ऑफ कंपनीज चे सर्व सदस्य व तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.