माजी वित्तमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांंना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री करावे : सामाजिक कार्यकर्ते जावेद अली यांची मागणी

84

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : माजी वीत्तमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, अशी मागणी समाजिक कार्यकर्ते जावेद अली यांनी केली आहे.

गडचिरोली हा जिल्हा गोरगरीब, आदिवासी व मागास असून आजही 70 वर्षे होऊन अतिशय मागास आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. गावात रस्ते नाही, पाण्याची सोय नाही, वीज नाही, आरोग्याची सोय नसल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. कित्येक वर्षांपासून अहेरी – सिरोंचा नॅशनल हायवेचे काम रेंगाडत आहे. अधिकारी एक ऐकायला तयार नाही. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार हे विकासाचे महामेरू आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा अभ्यास आहे. कोरचीपासून सिरोंचा प्रयन्त प्रत्येक गाव तोंडपाट आहे व विकास करण्याची जिद्द आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यात आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यास अनेक विकासकामे होऊ शकतात व प्रत्येक व्यक्ती आपली समस्या मांडून आपले लहान मोठे कामे करून घेऊ शकतो. करिता सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री बनवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जावेद अली यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.