माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर तसेच शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

67

– आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळ यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
धानोरा रोडवरील इंदिरानगर येथील इंदिरा गांधी प्राथमिक शाळेमध्ये दि. ८ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजतापर्यंत भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर, शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी गडचिरोली शहरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.