इंजि. डॉ. सुरेश लडके यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात वृद्धांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप

89

– एक अभिनव उपक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सतत सामाजिक व शैक्षणिक कार्यात कार्यमग्न असणारे इंजि. सुरेश लडके यांचा ६० वा वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमात वृद्धांच्या व मित्रमंडळी च्या समवेत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी अन्नधान्याच्या स्वरूपात व इतर नित्योपयोगी वस्तूंचे वाटप वृद्धांना केले. यावेळी वृद्धाश्रमाच्या वतीने सुद्धा त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सहचारिणी स्मिता लडके, दादाजी चूधरी, डॉ. मिलिंद नरोटे, विलास निंभोरकर, प्रा. शेषराव येलेकर, चंद्रकांत शिवणकर, महावितरणचे अभियंता पुरूषोत्तम वंजारी, विनोद कोल्हटवार, विशाल जयस्वाल, प्रफुल्ल पिंपळकर, राणे, संजीवनी शाळेचे चुटे सर, प्रज्ञा संस्कार कान्वेंटचे प्राचार्य चेतन गोरे, तसेच शिक्षक वृंद रिजवाना पठाण, राहुल मडावी, जयश्री मुळे, गावंडे मॅडम, वृध्दाश्रमाचे संचालक सुनील पोरेड्डीवार, व्यवस्थापक चांदेकर इतर सहकारी, वृद्धाश्रमातील कर्मचारी वर्ग आणि इतर मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृद्धाश्रमांना सरकारी अनुदान बंद झाल्यामुळे मागील जवळपास सोळा वर्षापासून वृद्धाश्रमातील विद्युत प्रवाह बंद होता. त्यामुळे वृद्धांना अंधार व इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. सुरेश लडके यांनी स्पंदन फाऊंडेशनतील डाॅक्टर मंडळी व महावितरण मधील अभियंत्यांशी विचारविनिमय करून यावर तोडगा काढण्यासाठी वृध्दाश्रम कार्यकारी मंडळाशी चर्चा करून सगळ्यांच्या सहकार्याने निधी जमवून वृद्धाश्रमातील थकीत बिल भरण्यात आले व त्यामुळे वृद्धाश्रम पूर्वीप्रमाणेच प्रकाशमान झाले आहे. त्याचप्रमाणे सध्यस्थितीत पुरेसे शासकीय अनुदान नसल्यामुळे येथील वृद्धांना दैनंदिन जेवनाचा प्रश्न उद्भवत होता. यावर सर्व संमतिने उपाय शोधून इंजि. सुरेश लडके यांनी २० ते २५ मित्रमंडळींना हाताशी घेऊन त्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचे व लग्नाचे वाढदिवसानिमित्त वृद्धांसाठी अन्नधान्य व नित्य उपयोगी वस्तूंचे वाटप करण्याची अभिनव कल्पना आखली आणि ती या वर्षापासून कृतीत आणली. याव्यतिरिक्त शहरातील सामाजिक व्यक्तींनी या उपक्रमात भाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. याच विचारातून डॉ. मिलिंद नरोटे आणि त्यांची मित्रमंडळी वृद्धाश्रमातील वृद्धांची नियमित आरोग्य तपासणी व औषधोपचार करीत असतात. यापुढे वृध्दाश्रमात वृध्दांना कोणतीही समस्या उदभवल्यास सगळ्यांच्या सहकार्याने तिचे निराकरण करण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला.
इंजि. सुरेश लडके नेहमीच आपली सेवा सांभाळून सामाजिक क्षेत्रात जसे लायन्स क्लब, मराठा सेवा संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे कार्य करून समाजाला आपली सेवा देत होते आणि आता निवृत्तीनंतर सुद्धा त्यांचे कार्य अविरत सुरु आहे. दंडकारण्य शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेन्ट चे संचालक आहेत. प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेन्ट मध्ये सुद्धा त्यांचा वाढदिवस आज तेथील विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. गडचिरोली जिल्हा साठी अभिमानास्पद असे 100 विद्यार्थी या कॉन्व्हेन्टमधून तयार होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संकल्पना राबविणे, अभ्यासा व्यतिरिक्त आत्मविश्वास निर्माण करणे व व्यावहारीक जिवनात स्वता:ला प्रस्थापित करण्यासाठी शाळेतर्फे योग्य ते मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे.