भाजपच्या महाजनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे आवाहन

126

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने महाराष्ट्र राज्यातील भ्रष्टाचारी, घोटाळेबाज, अत्याचारी, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दि. 4 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे महाजनआक्रोश मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला विशेष मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा ना. देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे माजी वित्त, नियोजन व वनमंत्री तथा आम. मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, विधान परिषद सदस्य तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा. चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, नागरिक, महिला व युवक- युवती, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी केले आहे.