Home गडचिरोली कळमटोला येथील ‘तबाही लावणी अँड डान्स ग्रुप व रुबाब लावणी डान्स ग्रुप’...

कळमटोला येथील ‘तबाही लावणी अँड डान्स ग्रुप व रुबाब लावणी डान्स ग्रुप’ डान्स हंगामाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

38

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथे नवयुवक मंडळ, कळमटोला यांच्या सौजन्याने “तबाही लावणी अँड डान्स ग्रुप व रुबाब लावणी डान्स ग्रुप” या डान्स हंगामाचे आयोजन 19 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात आले.

वर्षभर बळीराजा शेतात राबतो. शेतीची मळनी होताच ग्रामीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणुन आज मौजा कळमटोला येथे नवयुवक मंडळ, कळमटोला यांच्या सौजन्याने “तबाही लावणी अँड डान्स ग्रुप व रुबाब लावणी डान्स ग्रुप ” या डान्स हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी यादवजी लोहबरे, गोपाल मोगरकर, यादवजी चौधरी, विनोद चापले, प्रशांत ठाकूर, स्वप्नील जुमनाके, रामेश्वर कारेते, साईनाथ उईके, मनोज ढोणे, श्रीकांत जांभूळकर, श्रीकृष्ण भोयर, ईश्वर मेश्राम, राकेश गजबे, आदित्य सहारे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!