राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा गडचिरोली येथे संपन्न
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : वधू-वर व पालक परिचय मेळाव्यामुळे समाजातील सुशिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींना एकत्र आणुन योग्य जोडीदार जुळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध होत आहे, असे प्रतिपादन नगर परिषद गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका योगिता प्रमोदजी पिपरे यांनी केले.
श्री. द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था आरमोरी व संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोलीच्या संयुक्तपणे रविवार, 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी १२ वाजता वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आपल्या मार्गदर्शनात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोलीचे अध्यक्ष प्रभाकरजी वासेकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित पुणेचे संचालक प्रमोदराव पिपरे तर प्रमुख पाहुणे म्हणून देवाजी सोनटक्के, एम. डी. चलाख, शिलाताई सोमनकर, भैयाजी सोमनकर, विलास अडकीने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमोदराव पिपरे म्हणाले, अशा मेळाव्यातून पैशाची वेळेची बचत होत असून समाजातील नाती अधिक दृढ होण्यास मदत होत असते. यावेळी प्रभाकर वासेकर यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन पितांबर कुकडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपीचंद बोदलकर यांनी केले. यावेळी नगर परिषद गडचिरोलीतील पदाधिकारी, अधिवक्ता वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, विविध तेली समाज संघटनांचे प्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक, व्यापारी वर्ग व प्रतिष्ठित नागरिक व तेली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १०० वधू-वरांनी सहभाग नोंदविला. पालकांसह एकूण सुमारे ३०० जण उपस्थित होते. वधू-वरांनी आपला परिचय देत संवाद साधला. कार्यक्रमाचे आयोजक श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था व समाज सदस्यांच्या सहकार्याने तसेच Wadhuwar Parichay OPC Pvt. Ltd. अध्यक्ष श्री द्वारकाप्रसाद सातपुते कार्यकारी मंडल यांच्या माध्यमातून करण्यात आले. समाजातील युवक-युवतींना योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.







