Home गडचिरोली खेलो इंडिया ट्रायबल गेम्ससाठी शासकीय आश्रमशाळेची प्रीतिलता पुजेरी हिची निवड

खेलो इंडिया ट्रायबल गेम्ससाठी शासकीय आश्रमशाळेची प्रीतिलता पुजेरी हिची निवड

75

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : युवा कार्यक्रम खेल मंत्रालय व भारतीय खेल प्राधिकरण यांचा संयुक्त विद्यमाने १८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत डी डी ए, यमुना स्पोर्ट कॉम्प्लेक्स, न्यू दिल्ली येथे फेज २ निवड़ चाचणीचे आयोजन केले होते. यात पहिली राष्ट्रीय खेलो इंडिया ट्रायबल गेम्स करिता येथील सेमाना बायपास रोडवरील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील इयत्ता नववीची प्रीतिलता संतुराम पुजेरी हिची धनुर्विद्या रिकर्व राउंड या प्रकारात निवड़ झाली. २८ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान बिलासपूर (छतीसगड़) येथे होणाऱ्या सदर स्पर्धेत ती खेळणार आहे.

तिच्या यशाबद्दल सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी अरुण एम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ. प्रभु सादमवार, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका वंदना महल्ले, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, चंद्रशेखर मेश्राम, श्रीराज बदोले, नाजूक उईके, सुप्रसिद्ध बडकेलवार, गड़चिरोली जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव डॉ. श्याम कोरडे, सुशील अवसरमोल, पायलेट प्रोजेक्र्ट धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक रोशन सोळंके, कौमुदी श्रीरामवार, हिमालय शेरखी, अधीक्षक देविदास चोपडे, अधीक्षिका निमा राठोड, शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रीतिलता पुजेरी हिचे कौतुक केले आहे.

error: Content is protected !!