Home गडचिरोली मार्कंडादेव येथे वैनगंगा नदी घाटाची स्वच्छता

मार्कंडादेव येथे वैनगंगा नदी घाटाची स्वच्छता

102

संत निरंकारी मिशनचा स्तुत्य उपक्रम ; २०० भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सद्गुरु बाबा हरदेव सिंह महाराज यांच्या वचनानुसार स्वच्छता हे मानवाच्या शारीरिक व आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे. या उदात्त हेतूने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन या स्वच्छता उपक्रमाचे आयोजन निरंकारी मिशन नवी दिल्ली शाखा चामोर्शीच्या वतीने मार्कंडादेव येथील वैनगंगा नदी घाटावर रविवार, २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या उपक्रमात सुमारे २०० निरंकारी भक्त,भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चामोर्शी येथील संत निरंकारी मंडळाचे देवनाथ धोडरे होते. स्वच्छता उपक्रम कार्यक्रमाचे उद्घाटन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मार्कंडादेवचे मुख्याध्यापक प्रमोद वरगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्कंडादेव ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता मोगरे, पोलीस पाटील आरती आभारे, उपसरपंच उमाकांत जुनघरे, राजू मोगरे, कोमरू मिडपल्लीवर, संभाजी भुरसे, सुधाकर लोणारे, चिन्नाजी करेवार, मारोती कोरीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

संत निरंकारी मिशन चामोर्शीच्या वतीने आयोजित केलेल्या पाणीघाट स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोजराम लंजे यांनी केले. संचालन प्रफुल गव्हारे तर आभार प्रदर्शन फुलचंद गेडाम यांनी केले. स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेसाठी निरंजना रामटेके, वंदना ढोडरे, नाजूक येलमुले, रवींद्र बुरांडे, घनश्याम बोधलकर, घनश्याम वासेकर, वसंत वासेकर, प्रभाकर कळसकर,
सुभाष मिडपलीवार, मारोती लेनगुरे, अशोक पुल्लिवार, प्रभाकर गव्हारे, बालाजी गव्हारे आदींनी सहकार्य केले.

error: Content is protected !!