– कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जीवनात यश – अपयश येतच असतात. अपयशी झालात तरी खचून न जाता पुन्हा जिद्दीने मेहनत करून जीवनात यशस्वी व्हा, असे आवाहन भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी खेळाडूंना केले.
गडचिरोली तालुक्यातील सावेला जवळच्या कोसमघाट येथे सातबारा क्रीडा मंडळ कोसमघाट यांच्या वतीने भव्य कबड्डी आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, उपाध्यक्ष अनिल कोठारे, नगरसेवक रमेश चौधरी, जिल्हा महासचिव नदीम नाथानी, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, बाळू गोवर्धन, श्रीनिवास ताडपल्लीवार, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, गणेश धाईत, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने, पोलिस पाटील सुधाकर वड्डे, शिवणकर, मडावी सावेला, कुमोद भोयर, विकास देशमुख, गजानन वडे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक तथा गावकरी मंडळी उपस्थित होते.







