Home गडचिरोली नाटकातून चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात : ॲड. विश्वजीत कोवासे

नाटकातून चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात : ॲड. विश्वजीत कोवासे

32
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नाटक हे मनोरंजनाचे माध्यम असून जीवनात चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात, असे आवाहन भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी रसिक प्रेक्षकांना केले.

चामोर्शी तालुक्यातील कुथेगाव येथे नवयुवक – युवती बचतगट यांच्या सौजन्याने संगीत ‘आदीम क्रांती’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, उमेश कुमरे, सागरताई कुमरे, रमेश कोठारे, आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबाप उपस्थित होते.

error: Content is protected !!