Home गडचिरोली कबड्डी म्हणजे शारीरिक तंदुरूस्ती व निरामय जीवनाचा खेळ : अरविंदभाऊ कात्रटवार

कबड्डी म्हणजे शारीरिक तंदुरूस्ती व निरामय जीवनाचा खेळ : अरविंदभाऊ कात्रटवार

84
Oplus_16908288

– अमिर्झा येथे रंगला कबड्डीचा रणसंग्राम ; अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कबड्डी हा मैदानी आणि सांघिक खेळ आहे. या खेळाचा उगम हजारो वर्षापूर्वी झाला. पुर्वीच्या काळी कबड्डीचा खेळ खेड्यापाड्यात शारिरीक तंदुरूस्तीसाठी खेळला जायचा. या खेळाची महत्ती आजही कायम आहे. आता ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात सुध्दा हा खेळ अतिशय लोकप्रिय झाला असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहचला आहे. कबड्डीच्या मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या खेळामुळे शारिरीक व मानसिक तंदुस्ती बरोबरच निरामय जीवनाची प्राप्त होते. त्यामुळे युवकांनी मैदानी खेळावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.

न्यू कबड्डी क्लब अमिर्झा यांच्या वतीने भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्‌घाटन कात्रटवार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी खेळाडू व उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडागुणांना चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्या संघाला अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने 40,001/जी प्रथम क्रमांकाचे पारितोषीक देऊन गौरविण्यात येणार आहे. अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, प्रत्येक युवकांमध्ये क्रीडागुण असतात. त्याच्या क्रीडागुणांना वाव देऊन योग्य ते मार्गदर्शन व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जगभरात क्रीडा क्षेत्राला महत्व प्राप्त झाले असून या क्षेत्रात युवकांना आपले ‘करीअर’ घडविण्याची संधी आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्या युवकांनी खेळावर लक्ष केंद्रीत केल्यास ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होऊ शकतात.

कबड्डी हा सांघीक खेळ असून विजयात प्रत्येक खेळाडूचे योगदान लाभले पाहिजे. संघातील प्रत्येक खेळाडूंनी संघभावनेने खेळाचे प्रदर्शन करून उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवावे. स्पर्धेच्या माध्ममातून प्रत्येक खेळाडूला आपल्या क्रीडागुणांची छाप पाडण्याची संधी मिळते. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून क्रीडा क्षेत्रात आपला नावलौकिक वाढविला पाहिजे. मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील युवकांच्या क्रीडा विकासासाठी मी कटीबध्द आहे. खेळाडूंना आवश्यक ती मदत भासल्यास सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे, असेही अरविंदभाऊ कात्रटवार याप्रसंगी म्हणाले.

याप्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपाल मोगरकर, विनोद चापले, यादवजी चौधरी, प्रशांत ठाकूर, स्वप्नील जुमनाके, चेतन मांगुळ्दे, निखिल घोडमारे, दिनेश मांगूळदे, महेश चौधरी, भुजंग गरमळे, निखिल मंगर, विनोद नन्नावरे, लीलाधर घोडमारे, सौरव साहारे, आशिष मांगुळदे, इसराईल शेख, विनोद भैसारे , चंदू नन्नावरे, सुचित नारनवरे, खेमाजी नन्नावरे, कुंदन दोडके यांच्यासह शेकडो शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!