Home गडचिरोली चातगाव – कारवाफा मार्गावरील पुलाच्या कामाची धडक पाहणी ; प्रशासनाला कडक निर्देश

चातगाव – कारवाफा मार्गावरील पुलाच्या कामाची धडक पाहणी ; प्रशासनाला कडक निर्देश

50

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ​गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चातगाव – कारवाफा मार्गावरील पुलाच्या कामाची आज आमदार डॉ. मिलिंद नरोटेbयांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पुलाचे काम अत्यंत संथ गतीने (कासवगतीने) सुरू असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना आणि विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना ये – जा करताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आज ठणकावून सांगितले की, पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून येत्या काही महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालाच पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पुढील दोन दिवसांत तात्पुरता पर्यायी मार्ग तयार करण्याचे कडक निर्देश प्रशासनाला दिले आहेत. जनतेच्या हिताच्या कामात कसलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.”

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, भाजपा धानोरा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, सिन्नुभाऊ दुल्लमवार, पवनजी येरमे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे धीरजजी बड्डे, पुरुषोत्तमजी मेश्राम व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!