Home गडचिरोली मौशीखांब – मुरमाडी जि. प. क्षेत्रातील प्रत्येक गाव आणि सर्व समाज घटकांचा...

मौशीखांब – मुरमाडी जि. प. क्षेत्रातील प्रत्येक गाव आणि सर्व समाज घटकांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास : अरविंदभाऊ कात्रटवार

43
Oplus_16908288

– अमिर्झा येथील रबरी बाॅल क्रिकेट स्पर्धेचा समारोप ; अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सेव्हन स्टार क्रिकेट क्लब अमिर्झाच्या वतीने भव्य रबरी बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. रोमांचक झालेल्या क्रिकेट स्पर्धेचा समारोप नुकताच झाला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला अरविंदभाऊ कात्रटवार प्रामुख्याने उपस्थित होते.

आयोजकांनी नियोनबध्द आणि यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडल्याबद्दल अरविंदभाऊ कात्रटवार यांनी सेव्हन स्टार क्रिकेट क्लबच्या सदस्यांचे कौतुक केले. तसेच खिलाडीवृत्तीने खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या समस्त खेळाडूंची प्रशंसा केली. अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते स्पर्धेेतील विजेत्या संघाला पारितोषीक देऊन गौरविण्यात आले.

क्रिकेट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून यामुळे शारिरीक, मानसिक विकास आणि क्रीडागुणांचा विकास घडून येतो. यामुळे युवकांनी मैदानी खेळाकडे वळावे, असे आवाहनही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.

error: Content is protected !!