Home गडचिरोली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २९ नोव्हेंबरला गडचिरोलीत सभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २९ नोव्हेंबरला गडचिरोलीत सभा

43

– भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा प्रचार आता वेग घेत असून, मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची सभा उद्या, २९ नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे.

भाजपाच्या स्थानिक उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली असून, आगामी निवडणुकीतील पक्षाची भूमिका, स्थानिक प्रश्न आणि विकासविषयक मुद्दे मांडले जाण्याची अपेक्षा आहे. सभेला भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या सभेला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी केले आहे.

error: Content is protected !!