Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने अग्रेसर राहील : डॉ. अशोकजी नेते

गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने अग्रेसर राहील : डॉ. अशोकजी नेते

34

– गडचिरोलीत भाजपाच्या प्रचाराला जोरदार सुरुवात

– प्रभाग १ व ८ च्या प्रचार कार्यालयाचे मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक १ आणि ८ मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी नगरसेवक उमेदवारांना विजयाकडे नेण्यासाठी “एकदिलाने काम करा” असा उत्साहवर्धक संदेश देण्यात आला.
प्रभागनिहाय अधिकृत भाजपा उमेदवारांचे मार्गदर्शन

प्रभाग क्र. १ : रविंद्र श्रीराम कांबळे, भारती मोहन खोब्रागडे

प्रभाग क्र. ८ : शेखर प्रभाकर आखाडे, शिल्पा उद्धव गव्हारे (हेमके)

प्रभाग क्र. ११: अनिल तुकाराम तिडके, पायल बाबुराव आलाम (कोडापे), नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत भाजपा उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

गडचिरोली शेवटचा नाही तर विकासाचा अग्रेसर जिल्हा ठरणार : डॉ. अशोकजी नेते
मार्गदर्शन करताना माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. केंद्र व राज्यात भाजपा सत्तेत असल्याने नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात आली तर अनेक मोठी कामे वेगाने पूर्ण होतील. विकासाचा मार्ग गतीमान होईल.”
पुढे ते म्हणाले, “लक्ष्मी ही कमळावर बसते. त्यामुळे नगरपरिषदेत कमळ फुलवा. सर्वांगीण विकास हवा असेल तर प्रणोती सागर निंबोरकर यांना नगराध्यक्षा म्हणून, आणि सर्व भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे गरजेचे आहे.”

या उद्घाटन सोहळ्यास व प्रचारार्थ प्रामुख्याने आमदार तथा गडचिरोली निवडणूक प्रभारी बंटीभाऊ उर्फ किर्तीकुमार भांगडिया,आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष व निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, भाजपा नेते संजय गजपुरे, ज्येष्ठ नेते सुधाकर यनगंदलवार, माजी सभापती रंजिता कोडापे, चंद्रशेखर भडांगे, सोमेश्वर धकाते, पल्लवी बारापात्रे, जनार्दन साखरे, तसेच सर्व भाजपा नगरसेवक उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!