विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार कविताताई पोरेड्डीवार तसेच प्रभाग क्र. 12 चे उमेदवार विजय गोरडवार आणि शीतल ठवरे यांच्या प्रचारार्थ मतदार बंधु भगिनींच्या भेटी घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांना भरगोष मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार कविताताई पोरेड्डीवार, माजी. जि. प. सदस्य लालसू नागोटी, देवाजी सोनटक्के, काशिनाथ भडके, प्रभाकर वासेकर, रामचंद्र वाढई, योगेंद्र झंजाड, गौरव येनप्रेड्डीवार, जावेद खान, मीनलताई चिमुरकर, पल्लवीताई शंकरवार, संध्याताई ऊईके, कल्पनाताई नंदेश्वर, रिताताई गोवर्धन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







