Home गडचिरोली मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी केली भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या मैदानाची पाहणी

मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी केली भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या मैदानाची पाहणी

45
Oplus_16908288

– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

– गडचिरोली नगरपरिषद निवडणूक 2025

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील चामोर्शी रोड बसस्टँड समोरील भाजपा जनसंपर्क कार्यालयासाठी तयार करण्यात आलेल्या ग्राउंडची व्यवस्था व नियोजनाची पाहणी आज माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी केली.
ग्राउंडवरील सर्व विभागांची माहिती घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. जनसंपर्क सुरळीत व्हावा, प्रचाराला गती मिळावी आणि नागरिकांशी थेट संवाद प्रभावी राहावा, यावर त्यांनी विशेष भर दिला.

स्थळावर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गडचिरोलीतील भाजपा जनसंपर्क कार्यालय हे संघटित कार्यपद्धतीचे व जनतेशी जोडणीचे केंद्र बनणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या ठिकाणी उद्या, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार असून, सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. अशोकजी नेते यांनी केले आहे.

error: Content is protected !!